Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहकांसाठी सूचना



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चांडोळा,ता.मुखेड परिसरातील ग्राहकांना सुचित करण्यात येते की, दि.१२ सप्टेंबर २०२५ शुक्रवार रोजी आपल्या शाखेत फक्त कॅशचे च व्यवहार होतील. सकाळी १० ते दुपारी  ३ वाजेपर्यंत कॅश काउंटर चालू राहील.कॅश व्यतिरिक्त कुठलेही काम होणार नाही,जसे की मोबाइल नंबर बदलणे,नवीन अकाउंट उघडणे, एटीएम कार्ड सेवा, युपीआय संबंधित इतर सेवा पूर्णपणे बंद राहतील. आपले काही काम असेल तर १०,११ सप्टेंबर ह्या  तारखेस करून घ्यावे,असे चांडोळा महाराष्ट्र ग्रामीण  बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रफुल्लकुमार पुंडगे यांनी कळविले आहे.

तसेच दि.१३ सप्टेंबर २०२५ ते १६ सप्टेंबर २०२५  या दरम्यान होत असलेल्या 'सॉफ्टवेअर मायग्रेशन'  मुळे आपल्या बँकेची डिजिटल सेवा जसे की युपीआय, मोबाईल बँकिंग,एटीम,नेफ्ट,आरटीजीएस, सीटीएस  बंद राहील याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.