प्रतिनिधी:-लक्ष्मण बिल्हारे
श्री.पाईकराव सर यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेड येथुन बदली झाली असून त्यांनी आपण ज्या शाळेवर सात वर्षे नोकरी केली विद्यार्थ्यांना प्रेमाने शैक्षणिक आवड गोडी निर्माण करुण विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले परंतु शासन निर्णयानुसार बदली झाल्याने त्यांना नाईलाज असतो निरोप द्यावा लागला यावेळी पाईकराव सर यांनी आठवण म्हणून शाळेला वाटर फिल्टर भेट म्हणून दिले
सर आपली सेवा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची बीजे पेरणारा एक अनमोल काळ होता. आपल्या प्रेमळ स्वभावाने, कष्टाळू वृत्तीने आणि मार्गदर्शनाने शाळेला नवे रूप दिले तसेच, विद्यार्थ्यांना शिकण्यासोबतच चांगले संस्कार दिले तसेच सध्याच्या डीजिटल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा सुद्धा डीजिटल व्हावी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची सुद्धा माहिती व्हावी अभ्यास व्हावा यासाठी श्री.दत्ताभाऊ अंभोरे(जिल्हाध्यक्ष वैद्यकीय सहायता कक्ष) यांनी स्वखर्चाने शाळेसाठी वायफाय कनेक्शन दोन महीन्याच्या रिचार्ज सहीत शाळेला भेट म्हणून दिले. श्री.पाईकराव सर व श्री.दत्ताभाऊ अंभोरे यांचे मनापासून धन्यवाद





Social Plugin