Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत पानगाव येथे महसूल विभागातर्फे सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत१४१ कुटुंबांना पट्टे वाटप



जितेंद्र बहेकार प्रतिनिधी आमगाव 

शासनाच्या "सेवा पंधरवाडा" या उपक्रमांतर्गत आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पानगाव येथे १४१ कुटुंबांना त्यांच्या राहत्या घर जमिनीचे कायमस्वरूपी हक्काचे पट्टे महसूल विभाग आमगाव तर्फे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत पानगाव,रामाटोला व अंजोरा येथील१४१ कुटुंबांना हे पट्टे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमातून अनेक पिढ्यांपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधलेल्या लोकांना आता त्यांची ती हक्काची जागा म्हणून प्राप्त झाली.

 हा सेवा पंधरवाडा कार्यक्रम देवरी आमगाव विधानसभेचे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेत पार पडला असून कार्यक्रमात व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार मोनिका कांबळे,गटविकास अधिकारी एन बी गट्टूवार,नायब तहसीलदार सतीश वेलादि, ठाणेदार तिरुपती राणे, सरपंचा मंगलाताई कोरे, व महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.