Ticker

6/recent/ticker-posts

श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे कुणबी वाडी ग्रामस्थांचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश



 *उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी ला धक्का ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांचा समावेश*

 

प्रतिनिधी/ संदीप लाड 

 श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला जिल्हा परिषद गटातील गालसुरे कुणबी वाडी येथील ग्रामस्थांनी दक्षिण रायगड सरचिटणीस प्रशांत शिंदे प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला यावेळी सर्व ग्रामस्थांचे प्रशांत शिंदे यांनी पक्षात स्वागत केले  व पुढे म्हणाले की, भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून एक कुटुंब आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बागमांडला जिल्हा परिषद गटात व वालवटी, बागमांडला पंचायत समिती गणात भाजप पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेल. गालसुरे गावातील विकास कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध केला जाईल, असा विश्वास यावेळी शिदे यांनी व्यक्त केला. गालसुरे ग्रामस्थांच्या अडचणीच्या काळात भाजप पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. त्यांना सर्वोतोपरी ताकद भाजप पक्षातर्फे दिली जाईल.

कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील तालुका सरचिटणीस उमेश आडखळे तालुका सरचिटणीस तेज अडुळकर तालुका कोषाध्यक्ष गजानन निंबरे तालुका चिटणीस मंगेश खैरे तालुका चिटणीस वसंत यादव उपाध्यक्ष भाऊ पाटील बागमांडला अध्यक्ष तुषार विचारे गट अध्यक्ष सुदेश पोलेकर तालुका उपाध्यक्ष संतोष पारधी तालुका चिटणीस संतोष रटाटे  उपस्थित होते