ग्रामीण प्रतिनिधी,महमदरफी मदार आदमपुकर
नांदेड:महाराष्ट्र ग्रामीण बँक व कोकण विदर्भ ग्रामीण बँक यांच्या एकत्रीकरणामुळे महाराष्ट्र राज्यात एकंच ग्रामीण बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या एकात्मतेचा,मैत्रीचा आणि बंधुत्वाचा सोहळा म्हणून शनिवार २७ सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकत्र आणून, परस्परांच्या अनुभवांची देवाणघेवाण करत सामाजिक व संघटनात्मक एकजूट वाढवण्यासाठी स्नेहबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्दिष्टाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून शेकडो कंत्राटी कर्मचारी या मेळाव्यात उत्साहाने सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाला नांदेड,हिंगोली तसेच मराठवाडा,विदर्भ आदि भागातील राजकीय मान्यवर पाहुणे,बँकेचे अध्यक्ष,बँकेतील वरिष्ठ अधिकारी,
प्रतिष्ठित वैचारिक व्यक्तिमत्त्व उपस्थित राहून सदरील कार्यक्रमात प्रेरणादायी दिशादायी संबोधन करणार आहेत.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्क,हित आणि सन्मानासाठी होणारा हा मेळावा निश्चितच ऐतिहासिक ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.





Social Plugin