Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी- सिद्धांत नवले



रांजणगांवदेवी(प्रतिनिधी ) अशोक पंडित

शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात केवळ एकाच प्रकारचे पीक न घेता आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित पिकांच्या वाणाची लागवड करून आपला विकास साधावा असे आवाहन सिद्धांत सीड्सचे व्यवस्थापक युवा नेते सिद्धांत नवले यांनी केले आहे रांजणगाव देवी येथे सिद्धांत सीड्स व ए बी एस सीमेन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते 

सिद्धांत नवले पुढे आपल्या भाषणात म्हणाले की शेतकरी नेहमी ज्या पिकांना भाव असतो त्याच पिकाची परत लागवड केली जाते परंतु परिणामी एकच पीक जादा झाल्याने भाव कोसळतात आणि शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते म्हणून आपण वेगवेगळे पिके घेत राहिलो तर भाव टिकून राहतो आणि शेतकऱ्यांचे नुकसानही होत नाही व शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळतो तसेच शेती बरोबर इतरही जोडधंदे आपण विशेष प्रशिक्षण घेऊन केले पाहिजे त्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. सिद्धांत सीड्स नेहमीच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करत असते त्याचाच भाग म्हणून खडका गावात देखील अशाच प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले ए बी एस सिमेंस कंपनीचे डायरेक्टर रवींद्र नवले आपल्या भाषणात म्हणाले की ए बी एस सिमेंस हे उत्कृष्ट कालवड पैदास करण्याचे तंत्रज्ञान असून यामुळे दुधाळ जनावरांची चांगली संकरित जात तयार होते व दूध उत्पादन वाढते त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो . तसेच मुक्त गोठा व्यवस्थापन या विषयावर देखील त्यांनी सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले 

.यावेळी कंपनीचे झोनल मॅनेजर ज्ञानेश्वर फुंदे यांनी सायलेज मास्टर या मुरघास मका पिका  विषयी माहिती देताना सांगितले की मकाचे हे वाण अतिशय उत्कृष्ट असून यामुळे शेतकऱ्याचे एकरी उत्पादन वाढवून जनावरांना देखील पोषक आहार मिळतो. तसेच कंपनीच्या पिंक स्टार ,वर्धन या कांदा बियाणा विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या मेळाव्या प्रसंगी जालिंदर वाकचौरे, बाळासाहेब पेहेरे, शरद वाकचौरे, विनोद गव्हाणे, यांची देखील भाषणे झाली. नंतर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी  बक्षिसांचे आयोजन देखील करण्यात आले होते यामध्ये कांदा व मका बियाणे शेतकऱ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात आले. यामध्ये शिवाजी वाघ, कारभारी पेहेरे गणेश कापसे, ओंकार जावळे यांना बक्षीस मिळाले.यावेळी एकनाथ चौधरी, नारायण तांबे, मोहन पंडित, बबनराव शिंदे ,जालिंदर वाकचौरे, हरिभाऊ कापसे, दत्तात्रय वाकचौरे, अशोक पंडित, रवींद्र कांबळे, गणेश कापसे ,विशाल वाकचौरे, किसन जगताप, कारभारी चौधरी, सचिन तांबे, किशोर वाळुंजकर, बाळासाहेब वाकचौरे, गोरक्षनाथ गवळी, बाबासाहेब काळे, रामभाऊ चौधरी, हरिभाऊ चौधरी, सोपान वाघुले, डॉ कृष्णा चौधरी डॉ केतन पेहरे सचिन वाळुंजकर गणेश चौधरी, प्रल्हाद वाकचौरे, नंदू वाकचौरे, नारायण चौधरी वसंत चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, बाप्पू कापसे ,बाबासाहेब जावळे माऊली रोडगे, काका चौधरी, दिगंबर शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश जावळे यांनी केले तर रामभाऊ चौधरी यांनी उपस्थित सर्वांचे आभार  मानले.