Ticker

6/recent/ticker-posts

आमगव्हान ते शिऊर रस्ता बनतोय अपघाताचे कारण



हदगाव प्रतिनिधी (महा.ग्रा.न्यु.)

आमगव्हान ते शिऊर रस्त्यावर खड्डेच खडे.गेली अनेक दिवसांपासून ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून असल्याने वाहन चालवताना खडे चुकविता नाहक त्रास होत आहे तरी बांधकाम विभाग मात्र या रोड संदर्भात कोणीही उपाययोजना करण्यात येत नाही 

सदरील रोडवर माती मिस्रीत  मुरूम टाकण्यात आला आहे.अशा माती मिस्रीत मुरूम यामुळे अतोनात रोडवर चिखलाचे साम्राज्य निदर्शनास आले आहे.या भागातील नागरिकांना हा विदर्भ मराठवाडा जोडणारा मुख्य रस्ता आहे.बर्याच जनांचे अपघात सुध्दा झाले तरी पण या कडे जाणिवपूर्वक सदरील ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत 

या परिसरातील नागरिक हा रस्ता कधी बनेल या कडे लक्ष देऊन आहे.आमगव्हन ते शिऊर परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे