बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
विसापूर येथील जिल्हा परिषद शाळेला विसापूर शाळेच्या माजी विद्यार्थिनी सेवानिवृत्त पोलीस नाईक मा.शोभा ढोले - पिरंगुटे यांनी कलर प्रिंटरची अनमोल भेट दिली. विसापूर गावच्या माहेरवाशीण असलेल्या शोभा ढोले - पिरंगुटे यांनी शाळेची गरज ओळखून ही भेट दिली. शाळेने अनेक बाबतीत नावलौकिक मिळवला आहे. जिल्ह्यात नावारूपास आलेल्या माझ्या शाळेला मदत करताना मनस्वी आनंद होत आहे. विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या विकासासाठी भविष्यातही आवश्यक मदत करणार असल्याचे प्रतिपादन श्रीम पिरंगुटे यांनी व्यक्त केले. शिक्षण विभागाच्या वतीने केंद्रप्रमुख मा.रमेश सूर्यवंशी यांनी ढोले कुटुंबियांचे अभिनंदन करून आभार मानले. उपसरपंच राजेश ढोले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी चेअरमन राजेंद्र साळुंखे, मा.उपसरपंच कैलास साळुंखे, दिलीप ढोले, शिवाजी साळुंखे, सदाशिव सावंत, निलेश साळुंखे, अमित साळुंखे, सौ.तनुजा ढोले आदी ग्रामस्थ व वैशाली नांदे, स्मिता शेळके, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव, रेश्मा बोडरे हे शिक्षक उपस्थित होते. ज्ञानेश्वर धायगुडे यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक सौ.लतिका कर्पे यांनी आभार मानले.





Social Plugin