मन्सूर शहा. धोत्रा. भनगोजी :---
मुहम्मद पैगंबर यांची जयंतीनिमित्त चिखली शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चिखली शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवर माजी आमदार राहुल बोंद्रे सह सहकाऱ्यांनी गुलाब पुष्पवृष्टी करून समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
जुनागाव चिंच परिसरातील संत सावता माळी भवन येथे चिखली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शहर अध्यक्ष राहुल सवडतकर, विधानसभा समन्वयक प्रा. राजु गवई सर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष रिक्की काकडे, किसान सेलचे मिलिंद पालवे, कुणाल बोंद्रे, प्राचार्य निलेष गावंडे सर, सचिन बोंद्रे, डॉ. मोहमंद इसरार, नंदुभाऊ सवडतकर, माजी अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, प्रदीप पचेरवाल, तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव, डॉ. सत्येंद्र भुसारी, गोकुळ षिंगणे, दिपक थोरात, विलास कंटुले, विजय जागृत, जय बोंद्रे, डॉ. अमोल लहाने, भगवानराव खरात, आत्माराम देशमाने, डॉ. रविंद्र कमळस्कर, विकास लाहने, समाधान आकाळ, भास्कर चांदोरे, सुरेश बोंद्रे, विष्णु मुरकूटे, डिगांबर देशमाने, प्रकाश मगर सर, सर्जेराव भुते, व्यंकटेश रिंढे, सोशल मिडियाचे नितीन वाघ, कैलास जंगले, शुभम बुरकुल, विजय निकाळजे यांची उपस्थिती लाभली
.





Social Plugin