Ticker

6/recent/ticker-posts

मोताळा तहसीलदार हेमंत पाटील २ लाखांची लाच घेताना रंगेहात.पकडले गेले!



मन्सूर शहा. धोत्रा.भनगोजी. प्रतिनिधी.:-- प्राप्त माहितीनुसार   बुलढाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या कारवायांवर अँटी करप्शन विभागाने शनिवारी मोठा हातोडा मारला. मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील हे तब्बल २ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले! एका शेतकऱ्याची वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी तहसीलदाराने २ लाख रुपयांची लाच मागितली! या प्रकरणाची शेतकऱ्याने अकोला अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली! तक्रारीनंतर पथकाने सुयोजित सापळा रचला आणि बुलढाणा शहरातील तहसीलदारांच्या घरी छापा टाकला!

कारवाईदरम्यान तहसीलदार पाटील हे लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले गेले! या घटनेमुळे तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. “शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना आता तुरुंगाची हवा खावी लागेल,” अशी चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. अँटी करप्शन विभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचाराचे काळे चेहरे उघड झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर जनतेत विश्वास निर्माण झाला आहे.