अर्धापूर प्रतिनिधी/विश्वराज वाकोडे
किनवट सकल आदिवासी समाजाचा मोर्चा पहाटेपासूनच गावोगावातून समाजबांधव हातात झेंडे, ढोल-ताशे व घोषणांच्या गजरात मोर्चामध्ये दाखल होत होते.पारंपरिक पोशाख,वाघनख्याचे हार,तुरे, डोक्यावर पगड्या घेऊन बांधवांनी आपली खरी संस्कृती दाखवली.मोर्चामध्ये महिलांचा उत्साह विशेष लक्षणीय होता. लहान मुलेही हातात झेंडे धरून,घोषणाबाजी करत मोठ्यांबरोबर चालताना दिसत होती.मोर्च्याच्या वातावरणात “जय जोहार, जय आदिवासी” या घोषणांनी प्रचंड जोश निर्माण झाला.किनवट तालुक्याचे रस्ते पूर्णपणे आदिवासींच्या उर्जेने दुमदुमून गेले होते.या मोर्च्याद्वारे समाजाच्या हक्कांसाठीची एकजूट व ताकद शासनाला दाखवण्यात आली. समाज बांधवांच्या प्रचंड उपस्थितीने आदिवासी समाज अजूनही जागा आहे,आणि आपल्या अधिकारांसाठी नेहमीच लढण्यास तयार आहे हे स्पष्ट झाले.हा मोर्चा आदिवासींच्या हक्कांचा,अभिमानाचा स्वाभिमानाचा आणि ऐक्याचा ऐतिहासिक संस्कृतीचा प्रतीक ठरला आहे.





Social Plugin