Ticker

6/recent/ticker-posts

मनस्वी खवळे थांग ता स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड .



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]

 29 व्या राज्यस्तरीय थांग ता चॅम्पियनशिप 2025 अमरावती या ठिकाणी संपन्न झालेल्या या स्पर्धेत श्री नागनाथ विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज बुध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते . या स्पर्धेत मनस्वी दत्तात्रय खवळे दहावी या विद्यार्थिनी गोल्ड मेडल मिळून तिचीराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .यश दीपक खवळे 9वी व प्रणव सुधाकर खराटे 6वी या विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल मिळाले .त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे ,पर्यवेक्षक नाना दडस, ज्येष्ठ शिक्षक संजय माने यांच्या हस्ते गुलाब पुष्प व  मेडल देऊन सन्मान करण्यात आला .

 यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी  यांच्यावतीनेही अभिनंदन केले .या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन अजित पाटील यांचे मिळाले .या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन सरपंच सौ सुजाता बोराटे  , उपसरपंच , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयसिंह राजेघाटगे ,पत्रकार प्रकाश राजेघाटगे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य , माता पालक संघ , शिक्षक पालक संघ सर्व सदस्य आणि बुध व  पंचक्रोशी ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या ..