Ticker

6/recent/ticker-posts

आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेले कलगाव मात्र नावानेच मोठे आहे. येथील काम मात्र शून्यच आहे. असाच प्रकार आठवडी बाजारामध्ये पहावयास मिळत आहे. कित्येक वेळा तोंडी सांगून अर्ज देऊन आठवडी बाजारातील स्वच्छता होत नसल्याने महसूल हर्रास घेणारे ठेकेदार अब्दुल राजिक अब्दुल गफ्फार मात्र हतबल झाला आहे. रविवारला कलगाव येथे आठवडी बाजार असतो. कलगाव च्या आजूबाजूच्या खेडे गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक कलगावला बाजारासाठी येतात. 

आज रोजी मात्र आठवडी बाजारामध्ये सर्वत्र घाण पसरलेली आहे.बाजार ओठ्यावरच जनावर बांधल्यामुळे शेणमुत्र चाऱ्याचा कचरा,घाणेरडे पाणी बाजाराच्या आजूबाजूला पाहायला मिळत आहे भाजीपाला फळे आपण घरी आणत आहोत. या कारणामुळेच नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. बाजारातील दुकानदार मात्र महसूल देण्यास टाळत असल्याची खंत ठेकेदाराने व्यक्त केली. आम्हाला बाजार ओटे स्वच्छ करून द्या तेव्हाच पूर्ण महसूल घ्या. असे व्यापारी बोलत आहेत.