मन्सूर शहा, धोत्रा.भनगोजी.:--
- तक्षशिला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.व्हि .डी. लहाने सर यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी विद्यार्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
स्थानिक महाविद्यालयात 3 सप्टेंबर रोजी माजी विद्यार्थांतर्फे प्रा.व्हि.डी. लहाने यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यामध्ये माजी विद्यार्थी कलीम शहा , ईरफान शहा यांनी सरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी सरांनी मनोगत व्यक्त करतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल या प्रकारचे अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येतील असे मत व्यक्त केले.यावेळी प्रा.डी. एल.जाधव सर, प्रा.एस.एस. नागरे सर आदींची उपस्थिती होती
.





Social Plugin