देगलूर - प्रतिनिधी
दिनांक 31 8 2025 रोजी हनुमान हिप्परगा येथील अष्टविनायक बाल गणेश मंडळ यांनी पाच दिवसीय गणपती विसर्जन लहान बालकांनी टाळ मृदंगाच्या गजरात, भक्तीमय वातावरणात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. या मंडळाचे सर्व बालक सदस्य यांनी एक नवीन आदर्श दाखविला आहे. त्या बालकांनी व्यसनमुक्ती व भक्तीचा संदेश दिला. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार व कौतुक केले व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी हनुमान हिप्परगा गावचे आदर्श व्यक्तिमत्व देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यादवराव देसाई साहेब यांनी अध्यक्ष पद भूषविले, प्रमुख उपस्थिती हनुमान हिप्परगा गावचे सरपंच प्रतिनिधी सुरेश देसाई व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य संघटक संभाजी पाटील मंडगीकर, बीट जमादार कणकवले साहेब, तालुका सचिव सुनील हुंडे पाटील कारेगावकर, सुरज पाटील मलकापूरकर, युवराज कांबळे पाटील सुंडगीकर, तानाजी मरकंटे पाटील भोकसखेडकर, रामदास गवलवाड पाटील आचेगावकर, शिवकुमार पाटील ढोसणीकर, धम्मानंद पाटील कांबळे लिंबेकर, बालाजी पाटील जाधव टाकळी वडगकर, कैलास हसनाळे पाटील नारंगलकर, संयोजक आदर्श पोलीस पाटील गोवर्धन पाटील हनुमान हिप्पर्गेकर आदी पोलीस पाटलांची व गावकरी बांधव व भगिनींची उपस्थिती होती. कार्यक्रम हसत खेळत शांततेत संपन्न झाला.





Social Plugin