Ticker

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघातर्फे पोफळे दाम्पत्याचा सन्मान

 



मालेगाव प्रतिनिधी जावेद भवानीवाले


मालेगाव : मराठा सेवा संघाच्या ३५ वा वर्धापन दिनानिमित्त तथा संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता सन्मानदिन सोहळा वाशीम येथे पार पडला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. रवी दिनकर पोफळे व डॉ. भाग्यश्री रवी पोफळे व पोफळे दांपत्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. रवि पोफळे व डॉ. भाग्यश्री पोफळे दांपत्याचा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने येथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे,विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी प्राचार्य वसंतराव अवचार, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, प्रा. भरत आव्हाळे, इंजि. सुनिल कदम,अनंतराव गायकवाड, मराठा सेवा संघ मालेगाव तालुकाध्यक्ष तेजराव जाधव, सेवानिवृत्त शिक्षक दिनकरराव पोफळे आदी मान्यवर उपस्थित होते.