Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अंतरगाव येथे महिला बचत गटांना कर्जाचे वितरण



सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

प्रमुख उपस्थिती मा. रोहित भाऊ बोम्मावार संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. रोहित भाऊ बोम्मावार यांच्या प्रमुख उपस्थितीत सावली तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अंतरगाव येथे महिला बचत गटांना कर्ज वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

सदर कार्यक्रमात सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई भोयर, मा. राजुभाऊ ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समिती सावली, मा. प्रमोद भाऊ दाजगाये उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सावली, राजुभाऊ संगिडवार, निखिलभाऊ सुरमवार, कपिल भाऊ लोडेल्लीवार, जीवन कांबळे, यांच्या हस्ते ५ महिला बचत गटांना १०,००,००० ₹  (दहा लक्ष) रुपये चेकचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अंतरगाव चे शाखाधिकारी एस. जी. येरमे, निरीक्षक आणि बँकेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

या उक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महिला बचत गटाच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध असून स्वयंसहायता महिला बचत गटांना अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.