Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पारनेर येथे ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा



अंबड प्रतिनिधी,  गणेश सपकाळ

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयामध्ये ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अभिमन्यू गाढवे होते.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रल्हाद जाधव,श्री पांडुरंग गादे,श्री जीवन मगरे,श्री दिनेश खाडेभराड,श्री  आसारामजी बोराटे,श्री रवी दादा जाधव,श्री माधवजी गाडेकर,श्री शकील पठाण,श्री मुस्ताक शेख,श्री काळे सर,श्री शेख सर,श्री खांडेभराड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.साहेबरावजी अण्णा खरात यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यालयाच्या २५ व्या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.या वर्षीच्या भित्तिपत्रकाचा विषय"चांगल्या जीवनासाठी योग्य खा" हा होता.संयुक्त राष्ट्रांनी भरड धान्याला शरीरासाठी पौष्टिक आणि जीवनसत्त्वयुक्त मानले असल्यामुळे,विद्यार्थ्यांना भरड धान्याचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे पोषण समजावे,या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी भरड धान्याच्या फायद्यांविषयी भाषणे दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पोटफोडे सर यांनी केले, तर आभार श्री शेरे सर यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.