Ticker

6/recent/ticker-posts

प्रश्न मंजुषा स्पर्धेतील गुणवान विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न



अंबड प्रतिनिधी,  गणेश सपकाळ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथे शाळेचे मुख्याध्यापक महावीर शेलार,सरपंच दत्ता जाधव, मा.सरपंच शामसुंदर मुळे,बाळराजे जाधव,शा.व्य.समिती अध्यक्ष कारभारी मस्के,नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे उपक्रमशील शिक्षक प्रदीप जाधव,नरेंद्र रत्नपारखे,पांडुरंग गिरी,विठ्ठल पिंपळे,योग शिक्षक गजानन पांडुरंग पुरी, सिद्धेश्वर मुळे,विष्णु सुलताने,बाळू चौरे,सुभाष जऱ्हाड, राधाकिसन जाधव,मच्छिंद्र मस्के,सुहास साबळे,ऋषी मुळे, परमेश्वर बर्डे,हनुमान पुरी,भरत मुळे,सिद्धेश्वर इंगळे,कृष्णा मिसाळ,भुजंग घाटूळ,अंकुश इंगळे,शिक्षिका सारिखा इंगळे, अश्विनी चौधरी,सारिका मस्के,अंगणवाडी सेविका राधा चौरे, इंदुमती गुढेकर,कावेरी मुळे,मीना साबळे,मीरा मस्के आदी गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गुणवान विद्यार्थ्यांना योग शिक्षक गजानन पांडुरंग पुरी सर यांच्यावतीने रजिस्टर वाटप करण्यात आले.

 सर्वप्रथम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला परंतु ५६५ पैकी ५६२ संस्थानांनी स्वतंत्र भारतात समाविष्ट होणे संमती दर्शवली आणि तशी कार्यवाही झाली. मात्र हैदराबाद संस्थान जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतासमाविष्ट झाली नव्हती.या संस्थानावर निजाम मी उस्मान अली खान याचे राज्य होते भारताचे तत्कालीन पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी ११ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो राबवून संपूर्ण सैन्य घुसवून १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम सैन्यापुढे शरण आला . मराठवाडा निजामाच्या काळातून मुक्त झाला.मुक्तीसंग्राम दिनाच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठवाडा निजामाच्या काळातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ,दिंगबरराव बिंदू,गोविंदभाई श्रॉफ,देवीसिंह चव्हाण,  शंकरसिंग नाईक,बाबासाहेब परांजपे,दगडाबाई शेळके, काशिनाथ कुलकर्णी आदी हुतात्म्यांनी मराठवाडा हा निजामाच्या तावडीतून कसा मुक्त केला याविषयी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून विशद केले आहे.

तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेतील श्रद्धा खंडागळे,वैष्णवी मुळे,अक्षरा भाकरे,यश मस्के,अनुष्का उजेड,अक्षरा साबळे, शिवराज इंगळे,श्रद्धा काळे,शिवराज आदलिंगे,आरती मुळे, कुणाल मस्के,आदी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले असून शाळेत नवनियुक्त शिक्षक पांडुरंग गिरी सर,विठ्ठल पिंपळे यांचे शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सरपंच,उपसरपंच व सन्माननीय सदस्य अंगणवाडी सेविका,आशाताई ज्येष्ठ नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते