श्री हनुमानगिरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे मुलींचे आरोग्य मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
बुघ दि . [प्रकाश राजेघाटगे ]
कुमारवयीन काळामध्ये मुलींच्या मध्ये होणारा शारीरिक व भावनिक बदल याच्याशी जुळवून घेणे फार महत्त्वाचे असते. योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेतल्यास आजाराविषयीची भीती व व अज्ञान दूर होते. यामुळे आत्मविश्वास वाढतो व भविष्यातील धोके टळतात. मुलींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्यविषयक तक्रारीची जाणीव झाल्यास योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्यावा. आहार संतुलित असावा. खेळ व व्यायामातून आयुष्य तणावमुक्त बनते. मुलींना ताण तणावाचे व्यवस्थापन अशा मार्गदर्शन शिबिरातून मिळते. इतर शाळांनी देखील याचा आदर्श घ्यावा.असे विचार पुसेगाव येथील डॉ. सुजाता शिंदे यांनी व्यक्त केले.श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव यांच्या सौजन्यातून संस्थेच्या जांब, जाखणगाव, राजापूर रणसिंगवाडी पुसेगाव येथील सर्व शाखा मधील कुमारवयीन मुलींच्या आरोग्य शिबिरात त्या मार्गदर्शिका म्हणून बोलत होत्या.
आदर्श आरोग्य सेविका सुरेखा कुंभार यांनी वैयक्तिक आरोग्य, आढळणाऱ्या तक्रारी, घ्यावयाची काळजी, तसेच कुमारवयीन टप्पा व या नाजूक काळामध्ये योग्य ती खबरदारी घेतल्यास उज्वल भविष्य घडते. असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्था सचिव श्री. मोहनराव जाधव, संचालक श्री. एस.आर. पाटील सर, सदस्य श्री. जयंतराव जाधव, गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के.डी. पवार सर यांनी शुभेच्छा दिल्या. संस्था अध्यक्ष डॉक्टर श्री सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले . प्रास्ताविक के. डी. पवार सर यांनी केले.सौ. माधुरी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
सौ.अमृता जाधव यांनी स्वागत केले.
सौ. एस. जे. लाड यांनी आभार मानले.
कार्यक्रमास महिला शिक्षिका तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





Social Plugin