बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
ग्रामपरिवर्तन संस्था व अफार्मचे वतीने उपजीविका फळ झाडें लागवड रणसिंगवाडी येथे साजरा करण्यात आला . रणसिंगवाडी येथील पोलीस पाटील सुनील रणसिंग यांनी अफार्म व फेलो, श्री प्रताप गोरे यांचे वतीने बांधा वरील फळबाग उपक्रम व सेंद्रिय परसबाग उपक्रम मधून स्वतः ची उपजीविका वाढवावी असे प्रमुख मार्गदर्शन करताना सांगितले, बऱ्याच वेळा अवकाळी पाऊस व दुष्काळ येतो अश्या वेळी बांधा वरील फळ झाडें आपली उपजीविका वाढवू शकतात, तसेच सेंद्रिय भाजीपाला परस बाग ही उपजीविका साधन बनू शकते, व आपले आरोग्य ही चांगले राहते या बद्दल तसेच शासनाची "पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान,मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजना, बाबतीत ही मार्गदर्शन केलें.
या वेळी कृषी सखी,सौ सोनाली मसूगडे, सी, आ, पी सौ सुनीता पोतेकर, सरपंच श्री सुखदेव रणसींग, उप सरपंच श्री विठ्ठल मसूगडे, युवा प्रशिक्षक श्री सूरज पोतेकर, ग्रामसेवक श्री संजय काळेल, तसेच आर्ट ऑफ लिविंग टीचर सौ प्रियांका घनवट, सौ प्रांजली शिंदे यांचे हस्ते उपस्थित महिलांना व शेतकरी यांना, पेरू, कडीपत्ता, कागदी लिंबू, चिंच, बेल, अश्या फळ झाडें व औषधी वनस्पती तसेच बारा प्रकारचे फळ भाज्या बियाणे व माहिती पत्रक ही वाटप करण्यात आले,
या बरोबर सदर कार्यक्रम मध्ये खटाव तालुका मध्ये सेंद्रिय शेती तुन उपजीविका वाढ उपक्रम यशस्वी पणे राबवण्याचे उपस्थित महिला व शेतकरी यांनी आवाहन स्वीकारून मॉडेल गाव करण्याचे ठरवले असून या बद्दल कृती कार्यक्रम करण्याचे नियोजन अफार्म चे फेलो श्री प्रताप गोरे व ग्रामसल्लागार कमिटी ने ठरवले आहे, सदर उपक्रम साठी अफार्म चे प्रकल्प अधिकारी सौ वैशाली ताई गवंडी, तसेच अफार्म ट्रस्टी श्री संतोषजी राऊत, मा कार्यकारी अधिकारी श्री, सुभाष तांबोळी सो विशेष सहकार्य केलें.





Social Plugin