Ticker

6/recent/ticker-posts

तरुणांनी उद्योजक व्हावे : धनाजी गुजर



निढळ येथे उद्योजकता मेळावा उत्साहात 

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]  


तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय कडे वळावे.सध्याच्या काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे तरुणांनी आपला उद्योग व्यवसाय सुरू करावा.तरुणांनी नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे व्हायला हवे . महिला बचत गट व तरुणासाठी अनेक शासकीय योजना आहेत.असे निढळ तालुका खटाव येथे  धनाजी गुजर निरीक्षक उद्योग विभाग सातारा यांनी सांगितले.

 कार्यक्रमाचे आयोजन निढळ येथील उद्योजक प्रशांत (बाबा) पाटील यांनी केले. त्यांनी तरुणांना उद्योजकतेचे महत्त्व समजवून सांगितले. त्यांनी सांगितले आपण शासकीय योजनाचा लाभ घ्यावा. नवीन स्टार्ट अप सुरू करावा. आपल्याला व्यवसाय करण्यासाठी जी काही मदत लागेल ती मदत करण्यास प्रशांत (बाबा) पाटील मित्र मंडळ सदैव तयार असेल.

 यावेळी सरपंच चारुदत्ता  इंजे  उपसरपंच बाळा खुस्पे ग्रामपंचायत सदस्य  संजय भोंडवे  ,   ताया खूस्पे,संजय  जाधव ,सचिन भोंडवे आणि   सचिन खुस्पे नासीर शेख गावातील महिला बचत गट व युवक  उपस्थित होते.