बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती खटाव यांच्यामार्फत यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उपक्रम मा.याशनी नागराजन मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. तसेच खटाव तालुक्याचे संपर्क अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, खटाव तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री योगेश कदम व विस्तार अधिकारी श्री माधव बोईनवाड यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव बाबत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतला भेटी तसेच मार्गदर्शन करत असताना खटाव तालुक्यातील पुसेगाव भागामध्ये मध्ये कटगुण, फडतरवाडी नेर, गारवडी, काळेवाडी, उंबरमळे, कातळगेवाडी, पांगरखेल, फडतरवाडी बुध, पांढरवाडी इत्यादी गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक मंडळातर्फे एक गाव एक गणपती मागील बऱ्याच वर्षापासून हा उपक्रम राबवत आहेत यामध्ये सर्व मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव सादर करत आहेत , महात्मा ज्योतिबा फुले यांची कुलभूमी असलेल्या
कटगुण गावातील गणेश मंडळाला भेट दिली असता त्या ठिकाणी पर्यावरण पूरक गणेशोत्सव सादर करत असताना त्यामध्ये सर्वप्रथम श्री गणेशाची मूर्ती विसर्जित न करता ती पुढील चार ते पाच वर्षासाठी वापरतात, सदर मंडळाने श्री ची विसर्जन करताना गुलालाचा वापर करत नाहीत, कोणत्या प्रकारचे डॉल्बी वापरात नाहीत ढोल ताशाचा वापर करून विसर्जन केले जाते, गावामध्ये दररोज वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेतले जातात जसे की रक्तदान शिबिर, हुंडाबंदी उपक्रम, महिलांची आरोग्य तपासणी, वृक्ष लागवड, पाणी वापरून बाबत मार्गदर्शन, सेंद्रिय शेती,महात्मा फुले यांच्या विषयी निबंध स्पर्धा, इत्यादी उपक्रम राबविले जातात.
तसेच सर्व सर्व ग्रामपंचायतीने निर्माल्य एकत्रित करण्यासाठी ट्रॅक्टर व्यवस्था केलेली आहे, तसेच श्रीच्या विसर्जनासाठी कृती तलाव तयार करण्यात आलेले आहे..





Social Plugin