डिस्कळच्या सुकन्येने पटकावला राज्यात पहिला क्रमांक
बुध , दि. [ प्रकाश राजेघाटगे ]
यूपीएससीतर्फे झालेल्या भारतीय सांखिकी सेवा (आयएसएस) परीक्षेत डिस्कळ, ता. खटाव येथील सुकन्या दिपाली दशरथ कर्णे हिने देशात चोवीसावी, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. माध्यमिक शाळेतील शिपायाच्या या सुकन्येने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही अभूतपूर्व यश मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल दिपालीचे सर्वत्र कौतुक होत आहे.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव उर्फ पां. वा. सुखात्मे हे बुध (ता. खटाव) येथील आहेत. आपल्या गावापासून केवळ आठ किमी अंतरावरील बुध येथील डॉ. सुखात्मे यांचा आदर्श घेऊनदिपालीने संख्याशास्त्रातील पदविका मिळविली. तिचे वडील दशरथ कर्णे हे सोळांकुर ता . राधानगरी येथील श्री यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालयात शिपाई आहेत, तर आई वंदना गृहिणी आहेत. त्यांना दीपाली व रूपाली या जुळ्या मुली आहेत. त्यानंतर दोघींनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन दोघींनी दैनंदिन अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार जून २०२० पासून आद्यासाला सुरुवात केली.
थोरली रूपालीसमवेत ग्रुप स्टडी करून दररोज प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव केला. दीपालीने रुपालीचे नियमितपणे 'मॉक इंटरव्ह्यू' घेतल्याने रूपालीचा आत्मविश्वास वाढला. आपल्या यशाचे श्रेय रुपाली, आई, वडील व भाऊ योगेश यांचे असल्याचे दिपालीने सांगितले. वृत्तपत्र वाचन व दूरदर्शनवरील बातम्या पाहून ताज्या घडामोडींचे ज्ञानही पक्के झाले. या परीक्षेसाठी कोणताही कोचिंग क्लास न लावता दिपाली परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरी गेली. यात तिने घवघवीत यश मिळवले.
कु. दिपाली दशरथ कर्णे 21 9 नोव्हेंबर 1997 रोजी जन्म झाला . प्राथमिक शिक्षण जि .प. शाळा डिस्कळ व जि.प. शाळा सोळांकुर जि. कोल्हापूर येथे झाले . माध्यमिक शिक्षण श्री यशवंतराव पाटील माध्य. विद्यालय सोळांकुर तर ११वी व 12 वी शिक्षण शिवराज विद्यालय मुरगुड येथे झाले . पदवी पर्यंत चे शिक्षण यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा , पदव्योत्तर (MSC) शिक्षण शिवाजी विदयापीठ कोल्हापूर . ESET exam qualify. 2020 पासून रुपाली व दिपाली या जुळ्या बहिणी UPSCची तयारी करत होत्या. 2021 साली रुपाली चे Upsc मधून आयएसएस ( भारतीय सांख्यिकी सेवा ) मध्ये महाराष्ट्रात पहिली व देशात पाचवी येण्याचा मान मिळविला .तिच्याबरोबर सुरु केलेल्या UPSC चा अभ्यास दिपालीने सोडलाच नाही . २०२१पासून 2024 पर्यंत upsc मध्ये लेखी मुख्य परिक्षा व मुलाखतीला पात्र होऊनही दिपालीचे मुख्य यादीत selection झाले नव्हते . 2023 पासून MPSC सरळसेवेतून पात्र होऊन धाराशिव येथे सांख्यिकी अन्वेषक म्हणून त्या काम करत अभ्यास करत होत्या .अखेर तो दिवस उजाडला . ३० सप्टेबर २०25 रोजी upscचा निकाल आला . अखेर दिपालीचे UPSC मधून ISS (भारतीय सांखिकी सेवा) मध्ये परिक्षा पात्र होऊन देशात २४वी रँक मिळवली. या यशाबददल दिपालीचे हार्दिक अभिनंदन . लहानपणापासून भाऊ प्रा .योगेश कर्णे सर यांनी जे स्वप्न बहिणींना दाखविले . ते बहिणीनी पूर्ण केले. दिपाली व रुपाली आणि भाऊ प्रा . योगेश ,बहिण सारिका योना आई वडिलांनी जे संस्कार दिले तो खरच आदर्शच आहे . आई वडिलांनी कठोर परिश्रमातून आणि कष्टातून मुलांना सक्षम बनविले त्याबद्दल त्यांचे खूप आभार . वडिल सध्या श्री यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय
सोळांकुर ता राधानगरी जि. कोल्हापूर येगे शिपाई पदावर कार्यरत आहेत. तर भाऊ प्रा. योगेश कर्णे सर यशदा सायन्स अॅकॅडमी पुसेगाव व डिस्कळ येथे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करतात . आई गृहिनी तसेच शेती करतात. खर तर या यशामध्ये आई वडिलांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. खरच मुलांना घडविण्याचा जो इतिहास या दाम्पत्यांनी रचला आहे तो आदर्श घेण्यासारखाच आहे.





Social Plugin