बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
शालेय क्रीडा खटाव तालुकास्तरीय स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित,श्री नागनाथ विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बुध मधील विद्यार्थीनी खटाव तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले . विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे व पर्यवेक्षक श्री नाना दडस यांच्या मार्गदर्शनाखाली कु . श्रद्धा दत्तात्रय फडतरे 10 वी हिने खटाव येथे झालेल्या तालुका स्तरीय स्पर्धेत 17 वर्षे वयोगटाखाली गोळ फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला . तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याबद्दल प्राचार्य अंकुश भांगरे यांनी या विद्यार्थीनीचे व पालकाचे अभिनंदन केले . यशस्वी विद्यार्थिनीला सहशिक्षक भगवान सरवदे यांनी मार्गदर्शन केले . विद्यालयातील विद्यार्थिनीनी विविध मैदानी स्पर्धेत सहभागी झाल्या . तसेच सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षक ,प्राध्यापक यांचे अभिनंदन , सरपंच सुजाता बोराटे , उपसरपंच तसेच सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभयसिंह राजेघाटगे ,प्राचार्य अंकुश भांगरे ,पत्रकार प्रकाश राजेघाटगे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,तसेच माता पालक संघ, . शिक्षक पालक संघ , बुध व बुध पंचक्रोशी ग्रामस्थ यांनी श्रद्धा चे अभिनंदन केले . सर्वशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही सहकार्य मिळाले .





Social Plugin