Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री हनुमानगिरी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे दणदणीत विजय



 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

श्री कात्रेश्वर  विद्यालय कातरखटाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत (17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील)  श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या संस्थेच्या श्री हनुमानगिरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज पुसेगावच्या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत दणदणीत विजय प्राप्त केला. गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता संस्था अखंड प्रयत्न करत असते. शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा  यामध्ये विद्यालय नेहमीच अग्रेसर ठरत आले आहे. जिल्ह्यातील नावाजलेल्या या शाळेने विद्यार्थी विकासाकरता नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून या शाळेचे अनेक विद्यार्थी  विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत आहेत.
 कबड्डी स्पर्धेतील या मोठ्या  यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉक्टर श्री सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव, खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव, सर्व संस्था पदाधिकारी, विदयार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के.डी. पवार सर, श्री जयंतराव जाधव, श्री एस.आर. पाटील सर, श्री डी. पी.  शिंदे सर, प्राचार्य श्री डी.एन. गोफणे, श्री मोहनराव गुरव, वोकेशनल विभाग प्रमुख  प्रा. जे.बी. जाधव सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक व ग्रामस्थांनी यशस्वी खेळाडूंची  अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  खेळाडूंना श्री अरुण गायकवाड, श्री अमर कवी, श्री बी. एस. जाधव, सौ. ज्योती जाधव, श्री मयूर जाधव, यांचे मार्गदर्शन लाभले.