भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, दिवाळीचा आनंद नागरिकांनी एकत्र येऊन साजरा करण्याची ही परंपरा अत्यंत सुंदर आहे. सचिनभाऊ साठे आणि त्यांच्या फाउंडेशनचे मनःपूर्वक अभिनंदन स्वागत, प्रास्ताविक करताना आयोजक सचिनभाऊ साठे म्हणाले की, नकारात्मकतेवर मात करून सकारात्मकतेचा, प्रकाशाचा मार्ग दाखवणारा सण म्हणजे दिवाळी. ‘दिवाळी पहाट – फराळ’ या उपक्रमामुळे संगीत, संस्कृती आणि आपले स्नेहबंध आणखी दृढ करण्याचा क्षण आहे.
यावेळी भुलेश्वर नांदगुडे, नितीन इंगवले, दिलीप बालवडकर, विजय जगताप, अनंत कुंभार, अनिल संचेती, अरविंद रणदिवे, गणेश कस्पटे, जेष्ठ नागरिक पिंपरी चिंचवड महासंघाचे अध्यक्ष वृषालीताई मरळ, सुरेश साठे, आप्पा थोपटे आदींसह परिसरातील नागरिक, युवा, महिला, विविध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी स्वरधारा म्युझिकल ग्रुप यांनी हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम सादर केला. दुसऱ्या दिवशी स्वरानंद म्युझिकल ग्रुप तर्फे डॉ. विजय पाटील, अश्विन भुते, सतीश इंगळे, पृथ्वीराज इंगळे, बबन ठोंबरे, किशोर देशमुख, विश्वास करंजे, सोमनाथ बरगुजे, स्मिता पाटील, मंगला जगताप, वैष्णवी शेवंते आणि गार्विका सोलंकी या स्थानिक कलाकारांनी सादरीकरण केले.
सकाळच्या उत्साहपूर्ण वातावरणात, विविध कलाकारांनी सादर केलेल्या उत्कृष्ट जुन्या, नव्या सुरेल संगीत रचना यामुळे ही ‘दिवाळी पहाट’ प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरली.





Social Plugin