धामणगाव (प्रतिनिधी):
शौर्य आणि स्वामीनिष्ठेसाठी ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांची जयंती आज, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी धामणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावकरी आणि युवकांनी दोन प्रमुख ठिकाणी एकत्र येऊन महाले यांच्या योगदानाला आदराने अभिवादन केले.
शिवतीर्थावर आयोजित मुख्य कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातही जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने युवक आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. उपस्थितांनी वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाचे आणि निष्ठेचे स्मरण केले. त्यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमांनी धामणगाव येथील सामाजिक एकोपा आणि इतिहासाप्रती आदर दर्शवला.





Social Plugin