Ticker

6/recent/ticker-posts

राजूर येथे बांधकाम कामगार व कुटुंब आरोग्य तपासणी शिबीर संपन्न



 प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

 बुलढाणा मोताळा दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 ला बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.   या कार्यक्रमासाठी  मार्गदर्शन डॉक्टर शेहजान सर, सचिन जाधव सर,विशाल जाधव,अनिकेत पवार, अंकिता सरकटे मॅडम, यांनी मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम निकाळजे यांनी केले व आभार प्रदर्शन विद्या गोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी अनिस खान सर (सरपंच राजुर)अध्यक्ष  होते. प्रमुख पाहुणे  डॉक्टर शहाजान खान, जी.आर पंधारे सर (ग्रामसेवक ), महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलढाण्याचे प्राचार्य डॉक्टर, प्राध्यापक अविनाश गेडाम सर,प्राध्यापक बोकाडे सर, प्राध्यापिका डॉक्टर  अस्मिता ठोंबरे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, पुरुषोत्तम गायगोळ नितेश मेढे ग्रामपंचायत कर्मचारी  तसेच अंगणवाडी सेविका,गावातील वृद्ध व्यक्ती, मजूर अहमद खान (माजी सरपंच) गावकरी यांची उपस्थिती लाभली.

यामध्ये बांधकाम मजुराची बीपी,शुगर तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.करण्यात आली. व कामगार धारकांचे कार्ड तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलढाणा.  मधील एम एस डब्ल्यू भाग दोन चे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेवून कामगार रुग्णांना तपासणी साठी मदत करण्यात आली. यामध्ये वैशाली थिगळे, माधुरी वेरुळकर, वैशाली लकडे, मनीषा पाली,.रामेश्वर तोंडे,प्रियंका श्रीवास्तव व पल्लवी श्रीवास्तव यांनी आरोग्य विभागांना सहकार्य केले.