प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
आज दिनांक 16 ऑक्टोंबर 2025 रोज गुरुवार,जि प हायस्कूल,मंगरूळ नवघरे. येथे कागदापासून आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यशाळेला अंशकालीन कलाशिक्षक श्री.रामेश्वर तोंडे सर,व पंढरी रिंढे सर ( कार्यानुभव ) यांनी मार्गदर्शन केले. या मध्ये कागदापासुन आकाश कंदिल,टाकाऊ पासुन टिकाऊ,पाण्याच्या बॅटल पासून आकाश दिवा, तेलाच्या कॅनीपासुन कचरा सुपलीचे प्रशिक्षण दिले.विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आंनदमय वातवरणात देण्यात आले.
यावेळेस प्राचार्य श्री. मा.वसंत गाडेकर सर, श्री सरोदे, श्री लोखंडे सर, श्री केदार सर श्री गोसावी, श्री चव्हाण सर, श्री डहाळे सर, श्री घुगे सर, श्री सुर्वे सर, श्री वायाळ,. श्री शेळके सर, श्री वांजोळ सर नेवारे मॅडम, भालेराव मॅडम, उंबरकर ताई व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यशाळेमध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेतला. आज आपल्या जि.प.हायकूल, मंगरूळ नवघरे मधील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम विविध कला, कागदापासून आकाश कंदील बनवण्याची कला विद्यार्थ्यांना यावी व कागद काम यावे. हाच नवीन शैक्षणिक धोरणानुसार किमान कौशल्याच्या आधारावर कार्यशाळा ठेवण्यात आली होती. हाच कार्यशाळाचा मुख्य उदेश आहे.





Social Plugin