Ticker

6/recent/ticker-posts

जि . प . हायस्कूल मंगरूळ नवघरे येथील रामनंदन केदार आदर्श पुरस्काराने सन्मानित



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

मंगरूळ नवघरे : जिल्हा परिषद माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय मंगरूळ नवघरे येथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक रामनंदन नारायण केदार यांना बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते शाल - श्रीफळ , गुलाबपुष्प व प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन आदर्श शिक्षक पुरस्कार सपत्निक प्रदान करण्यात आला.

    याबाबत असे की , रामनंदन केदार हे एक शिस्तप्रिय व उपक्रमशिल शिक्षक असून त्यांनी शाळेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य वसंतराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक शैक्षणिक , सांस्कृतिक व पर्यावरण पुरक विविध उपक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल त्यांना जि . प . प्रशासनाकडून मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे  शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य गावकरी मंडळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .