अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय समितीची निवड प्रक्रिया शांततेत व एकमताने पार पडली.या निवडीत अध्यक्षपदी कल्याण शिंदे तर उपाध्यक्षपदी भारत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून वैजनाथ फाटक,मंगलबाई राखुंडे, कविता शरद शिंदे आणि सुदाम बाबर यांची निवड झाली आहे.या निवडीमुळे गावात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थ,पालक तसेच शिक्षकवर्ग यांनी या सर्व निवडीस एकमुखाने पाठिंबा दर्शविला.निवडीनंतर नव्याने निवडून आलेल्या समिती सदस्यांचा शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या समितीने शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.नवीन अध्यक्ष कल्याण शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शाळेच्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांचा दर्जा तसेच क्रिडा आणि सांस्कृतिक विकास यावर विशेष भर दिला जाईल.शाळा आदर्श बनविण्यासाठी सर्वांचा सहकार्य आवश्यक आहे.
तर उपाध्यक्ष भारत पाटील यांनी म्हटले पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवू.या निवड प्रक्रियेस मुख्याध्यापक एच.बी.मुजांळ यांनी मार्गदर्शन केले.या वेळी पोलीस पाटील ईल्यास बागवान,शिवबा संघटना अध्यक्ष प्रताप राखुंडे, रईस बागवान,साजेद देशमुख,गजानन लंगोटे,राजू बागवान,अनिरुद्ध लंगोटे,इरफान बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.





Social Plugin