Ticker

6/recent/ticker-posts

*अंबड शहरातील भारत लॉजिंग फॅमिली रेस्टॉरंट अल्पावधीत ग्राहकांच्या यात्रेकरूंच्या पसंतीस*




*संपूर्ण परिवारासहित लज्जतदार जेवणाची अनोखी मेजवानी तर पर्यटक यात्रेकरूंना उत्कृष्ट,आधुनिक राहण्याची सुविधा प्राप्त*

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

अंबड शहर हे एक सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते.धार्मिक,शैक्षणिक,साहित्य,कला सामाजिक,राजकीय क्षेत्रात अंबड शहराचा नावलौकिक आहे.विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गावर मुख्य तालुक्याचे ठिकाण अंबड शहर आहे.मोठी बाजारपेठ,शासकीय कार्यालय,अनेक शैक्षणिक संस्था,अंबड शहरात असल्यामुळे जिल्हा बरोबरच पर जिल्ह्यातील,इतर राज्यातील व्यावसायिक, पालक भक्त पर्यटक,धार्मिक,शैक्षणिक,व्यापारी कामकाजासाठी अंबड शहरात येत असतात.

अंबड शहराच्या नावलौकिकात भारत लॉजिंग अँड रेस्टॉरंट मुळे या सर्वांना मोठी सुविधा प्राप्त झालेली आहे.अर्जुन लोहकरे व संदीप लोहकरे यांनी"ग्राहकांचे समाधान" हाच उद्देश समोर ठेवून लॉजिंग रेस्टॉरंट सेवेचा प्रारंभ केला आहे. अल्पावधीतच अंबड शहरवासी,यात्रेकरू पंचक्रोशीतील संपूर्ण परिवाराच्या पसंतीस भारत रेस्टॉरंटची सेवा पसंतीस उतरलेली आहे. आधुनिक आरामदेह राहण्याची उत्कृष्ट सेवे बरोबरच लज्जतदार,स्वादिष्ट जेवणाची अनोखी मेजवानी भारत रेस्टॉरंट प्रदान करते. 

पारंपारिक घरगुती कार्यक्रम,कुंकू टिळा,डोहाळे जेवण,वाढदिवस,चर्चासत्र,बैठका,गेट-टुगेदर याचे उत्तमरीत्या आयोजन करण्यासाठी विशेष सुविधा या ठिकाणी प्राप्त केली जाते.त्यास ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.त्याचबरोबर अनेक होतकरू तरुणांना रोजगाराची मोठी संधी यामुळे प्राप्त झालेली आहे.अंबड शहराच्या नावलौकिकात भर घालण्याचे कार्य भारत लॉजिंग रेस्टॉरंट मुळे होत आहे त्याचबरोबर ग्राहकांना, यात्रेकरूंना उत्कृष्ट सेवा देत असल्याबद्दल लोहकरे बंधूचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.