Ticker

6/recent/ticker-posts

आ. श्वेता ताई महाले यांच्या प्रयत्नाने चिखली तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी ग्रामीण रुग्णालयात अपंग बोर्डाचा शुभारंभ. तसेच महिलांसाठी मोफत सोनोग्राफी सेंटरचे उद्‌घाटन!!



 मन्सूर शहा. धोत्रा. भनगोजी 

चिखली ग्रामीण रुग्णालयात अपंग बोर्डाचा आरंभ, जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचे कष्ट व खर्च वाचणार:

आपल्या चिखली तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी ग्रामीण रुग्णालयात अपंग बोर्डाचा शुभारंभ आज झाला. तसेच महिलांसाठी मोफत सोनोग्राफी सेंटरचेही उद्‌घाटन केले. या वेळी तज्ज्ञ डाॅक्टरांनी विविध गावांमधून आलेल्या दिव्यांग बांधवांची तपासणी केली.

अपंग बोर्ड चिखलीत सुरू व्हावे म्हणून मी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने जुलै 2025 मध्ये या अपंग बोर्डास मंजुरी दिली होती. हे अपंग बोर्ड म्हणजे चिखली तालुक्यातील अपंग बांधवांसाठी मोठा दिलासा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होती की, चिखली ग्रामीण रुग्णालयात अपंग बोर्ड असावे. कारण चिखली तालुक्यातील अपंग बांधवांना आठवड्यातून ठरवलेल्या दोन दिवशी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात जावे लागत असे. तेथे जिल्हाभरातून आलेल्या प्रचंड गर्दीमुळे कधी कधी त्यांचा नंबरही लागत नसे. अशा वेळी निराश होऊन ते परत येत. यातून त्यांचा वेळ आणि पैसा तर वाया जातच होता, परंतु अपंग असूनही प्रवासाची दगदग सोसावी लागत होती.

ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार करून चिखलीत अपंग बोर्ड सुरू होण्यासाठी पुणे येथील अपंग आयुक्त कार्यालय व नवी दिल्ली येथील सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय येथे. कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्वेता ताई महाले यांनी पाठपुरावा केला  . 6 जून 2025 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक, बुलढाणा यांना अधिकृत मागणीचे पत्र दिले. 14 जून 2025 रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांनी शासनाकडे शिफारस पाठवली आणि 3 जुलै 2025 रोजी पुणे येथील अपंग व्यक्ती आयुक्त कार्यालयाने कागदपत्रे तपासून प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला आणि अखेरीस सामाजिक न्याय मंत्रालय, नवी दिल्लीने मान्यता व आयडी देत चिखली ग्रामीण रुग्णालयात अपंग बोर्ड सुरू करण्यास परवानगी दिली.

आता चिखली तालुक्यातील अपंग नागरिकांना अपंग कार्डासाठी वारंवार बुलढाण्याला जावे लागणार नाही.सर्व तपासण्या, प्रमाणपत्रे आणि सुविधा थेट ऑनलाईन पद्धतीने चिखली ग्रामीण रुग्णालयातच मिळतील. यामुळे वेळ, खर्च आणि श्रम वाचतील आणि खर्‍या अर्थाने अपंग नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. ही तपासणी दरमहा दुसर्‍या व चौथ्या मंगळवारी होणार असून चिखलीतील या महत्त्वाच्या सुविधेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी घ्यावा, असे आवाहन या निमित्त केले.

आजच्या सोहळ्यास जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. दत्तात्रेय बिराजदार, डॉ. सय्यद उमर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चिखली, डॉ. रवी शिंदे नेत्रचिकित्सक, डॉ. निकम चिकित्सक, डॉ. प्रियंका राठोड, डॉ. निकम अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ. खर्चे मनोविकार तज्ज्ञ, डॉ. रामानंद इंगळे बालरोगतज्ज्ञ, डॉ. उमेश सावजी, डॉ. विठ्ठल काळुसे, डॉ. दीपक भगत, डॉ. प्रशांत चिंचोले, डॉ. अमोल राजपूत, डॉ. राहुल राजपूत, डॉ. नेहा चिंचोले अवचार, डॉ. भूषण वानखेडे, डॉ. किशोर गवळी, डॉ. फारुख शेख, डॉ. प्रदीप मेहत्रे, डॉ. प्रीती रिंडे, डॉ. रश्मी पाटील, डॉ. प्रतीक्षा वायाळ, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. आदेश पखाले, श्री. रमेश डोके, श्री. सुशील वाहक, श्री. श्रीकृष्ण अवचार, श्री. सुशील वाघ, श्री. कार्तिक काकडे, श्री. संदीप दळवी, श्री. पुरुषोत्तम काळे, श्री. सुरज खिल्लारे, श्री. विशाल भगत, श्री. अमोल मेहत्रे, श्रीमती पूजा भांबळे, श्री. असलम शेख चिकित्सक आदींची उपस्थिती होती.