Ticker

6/recent/ticker-posts

रुई येथे राष्ट्रवादीला मोठा धक्का!



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

 जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.रुई येथील माजी पंचायत समिती सदस्य परमेश्वर बापू काळबांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक प्रमुख पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.हा प्रवेश भाजपचे आमदार श्री.नारायण कुचे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला,ज्यामुळे रुई गावात राष्ट्रवादीच्या गडाला मोठे खिंडार पडले आहे.

*या प्रमुख नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश*

या पक्षप्रवेशामध्ये माजी पंचायत समिती सदस्य श्री.परमेश्वर बापू काळबांडे यांच्यासह रुई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. विठ्ठल साळे,शालेय समितीचे उपाध्यक्ष व ग्रामपंचायत माजी सरपंच श्री.मच्छिंद्र भरपूर आणि इतर प्रमुख नेते व अनेक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.या सामूहिक प्रवेशामुळे रुईच्या राजकीय समीकरणात मोठे बदल झाले आहेत.

*राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार*

रुई हे गाव अंबड तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.या गावातील माजी पंचायत समिती सदस्य काळबांडे आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येथील संघटन खिळखिळे झाले आहे. आ.नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा पक्षप्रवेश झाल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र मोठा संघर्ष करावा लागणार आहे.या पक्षप्रवेशावेळी आ. नारायण कुचे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आणि भाजप सरकारच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली.