अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी भाव देणाऱ्या समृद्धी साखर कारखान्याकडून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाचा चौथा वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे.समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी हा निर्णय घेतला.
मराठवाड्यात उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून समृद्धी शुगर्स ओळखला जात आहे. सन २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला समृद्धी ने २९७० रु. प्रती मे.टन भाव जाहीर केला आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना पहिला हप्ता २५०० प्रती मे.टन प्रमाणे दिला. तर दुसरा आणि तिसरा हप्ता अनुक्रमे दोनशे व शंभर रुपये प्रमाणे दिला आहे.आता दिवाळी सणानिमित्त चौथा वाढीव हप्ता १०० रुपये प्रति मे.टन प्रमाणे दिवाळीपूर्वी शेतकरी सभासदांना मिळणार आहे.या शेतकरी हिताच्या निर्णयाचे शेतकऱ्यांनी फटाके फोडून स्वागत केले.शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल चेअरमन सतीश घाटगे यांचे आभार मानले.





Social Plugin