बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पळशी ता . खटाव येथील सद्गुरु मानाजीबाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालय येथे दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शालेय शासकीय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत नेत्र दीपक अशी कामगिरी करून घवघवीत यश संपादित केले आहे . विद्यालयाची विद्यार्थिनी कु . आकांक्षा विकास सूर्यवंशी हिने मैदानी स्पर्धेतील उंच उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादित केले तर साईराज कृष्णत शिंदे या विद्यार्थ्याने 5 किलोमीटर चालणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादित केले या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे होणाऱ्या विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे .विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री ए . जे .कुलकर्णी यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले . या यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रभाकर घार्गेसाहेब ,उपाध्यक्षा प्रीती घार्गे पाटील , मुख्याध्यापक श्री एम डी काटकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर कुकले, सरपंच सौ रेश्मा राऊत, मुंबईकर ग्राम विकास मंडळ पळशी आजी-माजी सैनिक संघटना पळशी तसेच सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .





Social Plugin