Ticker

6/recent/ticker-posts

अंबड नगर पालिकेच्या मतदार यादीत बोगस मतदाराचा सुळसुळाट



 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

 दि १ नोव्हेबर २०२४ रोजीच्या मतदार यादीनुसार अंबड नगरपरिषद हद्दीतील एकूण मतदार संख्या २७ हजार ९६२ इतकी असून या मतदारसंघात वाढ होऊन दिनांक १ जुलै २०२५ ही एकूण मतदार संख्या २९६५९ इतकी झालेली दिसते सदर बाप नगरपरिषद अंबडणे योग्य प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार लक्षात येते. परंतु आपल्या कार्यालयाला आम्ही दिलेल्या निवेदना नंतर कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार दि.१ नोव्हेंबर २०२४ ते १ जुलै २०२५ या काळात नव्याने नोंदणी झालेली मतदान संख्या ही ६११ इतकीच झालेली समजते.

 दि.१ नोव्हेंबर २०२४ आणि दि.१ जुलै २०२५ या दोन्ही वेळेच्या मतदार संख्येचा विचार केला तर या संख्येमध्ये १६९७ चा फरक येतो परंतु आपल्या कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार सदरील कालावधीमध्ये केवळ ६११ मतदाराची नव्याने नोंदणी झालेली आहे असे सांगण्यात आले आहे.परंतु १०८६ ही वाढीव मतदान कोठून आणि कोणत्या मार्गाने अंबड शहराच्या नगर परिषदच्या निवडणूक मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले? आणि ते कोणते?

 बोगस १०८६ मतदार अंबड शहराच्या मतदार यादीमध्ये कसे समाविष्ट झाले ? ते कोणत्या प्रभागात ? ते कोणते ? याचा खुलासा व्हावा आणि जो पर्यंत सदरील मतदान शोधून या मतदान यादीतून वगळण्यात येत नाहीत तो पर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये नसता या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल आणि याकरीता येणारा खर्च आपल्या कार्यालयाकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येईल.

 सदरील मतदार न वगळता निवडणूका लावल्या तर निवडणुकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बहिष्कार टाकण्यात येईल. यावेळी उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे,तालुकाप्रमुख दिनेश काकडे,माजी शहरप्रमुख कुमार रुपवते,रमेश वराडे,रवी इंगळे,दीपक खरात,दत्ता लोहकरे,राजू सराटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.