महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी रहाटणी पिंपरी चिंचवड ,
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या झालेल्या दुर्दैवी आत्महत्या प्रकरणाची एस.आय.टी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी साठी पिंपरी चिंचवड चे पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देण्यात आले तसेच हा खटला अतीजलद न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे, दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर वंजारी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन, चक्काजाम, या सह आंदोलात्मक भूमिका घेईल. असा इशारा दिला आहे.या वेळी वंजारी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष गणेश आर ढाकणे , माजी उप महापौर केशव दादा घोळवे , मा नगरसेविका योगिताताई नागरगोजे ,डॉ नारायण जायभाये , कैलास भाऊ सानप , लक्ष्मणजी वाघ , विनोद भाऊ मुंडे ,सुरेश घुगे मामा ,अमोल भाऊ नागरगोजे , गोरक्ष सानप , बद्रीनारायण घुगे ,गजानन सोनुने ,भाऊसाहेब कुटे ,वैजिनाथ शिरसाट (आम आदमी पार्टी )ज्ञानेश्वर नागरगोजे ,रामहरी केदार ,मारुती सोनटक्के , हनुमंत घुगे , श्रवण दहातोंडे , नरसिंगे सुनील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते . सर्व वंजारी समाज बांधव पिंपरी चिंचवड .वंजारी सेवा संघ पिंपरी चिंचवड.भगवान बाबा मित्र मंडळ पिंपरी चिंचवड.आम आदमी पार्टी.जय गणेश सामाजिक संस्था.





Social Plugin