Ticker

6/recent/ticker-posts

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या खेळाडूंनी विद्यापीठाच्या चतुर्थ वर्धापन दिनी मल्लखांब क्रिडाप्रकारात राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार प्रदर्शन करीत 'तिरंगा' फडकवला!



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा (KBP University Satara) च्या खेळाडूंनी तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या 'ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी मल्लखांब स्पर्धा २०२५' मध्ये चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या मुलांच्या संघाने 'कांस्य' (Bronze) पदक पटकावले. विद्यापीठाच्या मुलांच्या संघाने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत एकूण ६ कांस्य पदके जिंकण्याचा विक्रम केला. या अभूतपूर्व यशाच्या बळावर, मुलांचा संघ आता प्रतिष्ठेच्या ‘खेलो इंडिया’ (Khelo India) स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. मुलींच्या गटात 'रौप्य' (Silver) पदकाची कमाई केली असुन याबरोबरच मुलींच्या गटात विद्यापीठाच्या कु. भक्ती मोरे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवून २ रौप्य पदके जिंकत आपल्या कामगिरीची छाप पाडली. .

विद्यापीठा च्या संघाने एकूण ८ पदकांची कामाई केली आहे. संघाचे प्रशिक्षक प्रा. तुषार पोवार आणि संघ व्यवस्थापक प्रा. किशोर संकपाळ यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या मेहनतीचे आणि अथक परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दिमाखदार कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कुलाधिकारी मा. चंद्रकांत दळवी, विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार, घटक महाविद्यालयांचे प्राचार्य प्रि. डॉ. भारत जाधव, प्रि. डॉ. राजेंद्र मोरे, प्रा. डॉ. गणेश जाधव, सर्व अधिष्ठाता, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. उदय शिंदे, प्रा. किशोर संकपाळ आणि प्रा. विक्रमसिंह ननावरे, प्रशिक्षक प्रा. तुषार पोवार यांनी सर्व विजेत्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. २७ ऑक्टोबर हा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा वर्धापन दिन असून विद्यापीठाच्या या खेळाडूंनी राज्याचा आणि विद्यापीठाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर वाढवला असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.