Ticker

6/recent/ticker-posts

बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची दिवाळी बचत बाजार प्रदर्शन



 प्रतिनिधी सोमनाथ काळे

पुणे महानगरपालिका समाज विकास पुरस्कृत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रमाला उपस्थिती दर्शवली. वडगावशेरी येथील नवी भाजी मंडईत याचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे ७५ वे वर्ष आहे. यावेळी प्रदर्शनात सहभागी महिला भगिनींनी संवाद साधत त्यांच्या हस्तनिर्मित दिवाळी सजावटीच्या वस्तू, फराळ, दिवे, आकाशकंदील, पिशव्या, कपडे, भेटवस्तू इ. यांविषयी माहिती घेतली. महिला भगिनींना अवगत असलेल्या कौशल्यांना, कल्पकतेला आणि आत्मनिर्भरतेचा प्रोत्साहन देणारा हा उपक्रम म्हणावा लागेल. 

स्वावलंबनातून महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण, सबलीकरण या गोष्टी साध्य होत असतात आणि अशा प्रदर्शनातून तर त्यांच्या आत्मनिर्भरतेला योग्य दिशा मिळते. यासोबतच त्यांना आर्थिक बळ, आत्मविश्वास आणि समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधीही प्राप्त होते. 

या उपक्रमासाठी समाज विकास विभागाचे आणि सर्व बचत गटातील महिला भगिनींचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!