Ticker

6/recent/ticker-posts

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा . निषेध नोंदवण्यासाठी, भीम आर्मीचे जनआक्रोश मोर्चा.!!



 मन्सूर शहा धोत्रा. भ.प्रतिनिधी :--

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे. हा हल्ला सरन्यायाधीशांवर नसून भारतीय संविधानावर असल्याचे भीम आर्मीने म्हटले आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून भीम आर्मीचे वादळ १७ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे.

जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात टिळक नाट्य मैदान येथून दुपारी १ वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भीम आर्मीच्यावतीने प्रसिध्द पत्रकाव्दारे देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा भारतीय संविधानावर आहे. संविधान की सन्मान मे, भीम आर्मी मैदान मे... आता लढले नाही तर पुढचा नंबर तुमचा असेल असेही पत्रकात नमूद केले आहे. जनआक्रोश मार्चात हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे.