प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
आज दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत चिखली पंचायत समिती चे गटविकास अधिकारी आदरणीय वाघ साहेब यांनी जि प केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा मंगरूळ नवघरे येथे भेट दिली असता शाळेतील भौतिक सुविधा तसेच सर्व १ ते ४ च्या वर्गातील विद्यार्थी गुणवत्तेची पाहणी केली असता प्रचंड समाधान व्यक्त केले.. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गावकरी या सर्वांचे माध्यमातून शाळेत मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा निर्माण करण्यात येत असून सर्व शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांवर प्रचंड मेहनत घेत आहेत.. वर्ग पहिली ,दुसरी मधील विद्यार्थ्यांच्या सर्व राज्यांच्या राजधान्या, ५० पेक्षा जास्त देशांच्या राजधान्या तोंडपाठ आहेत.. तसेच ३ री, ४थी मधील विद्यार्थ्यांचे ५० पर्यंत वर्ग, ३० पर्यंत घन पाठ आहेत..सर्व वर्गातील विद्यार्थी इंग्रजीत Conversation करतात..
शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मोफत Abacus शिक्षण देण्यात येते.. मोठ्या प्रमाणावर विविध विषयांच्या Activities पाहून आदरणीय साहेब अवाक् झाले..! शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची स्वच्छता, टापटीप, शिस्त पाहून साहेबांनी आनंद व्यक्त करीत मुलांचे कौतूक केले.. अतिशय व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा साहेबांनी ३ तास आपला वेळ शाळेत मुलांमध्ये घालवत आनंद व्यक्त केला.. याबाबत साहेबांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गावकरी मंडळी तथा सर्व शिक्षकांचे कौतूक करीत मंगरूळ नवघरे शाळेचे विद्यार्थी भविष्यात नक्कीच मोठी क्रांती घडवून आणतील हा विश्वास व्यक्त केला..
*"जिंदगी की उडान अभी बाकी है..,*
*अपने इरादों का इम्तिहान अभी बाकी है ..*
*अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन हमने ..,*
*अभी तो सारा आसमान बाकी है.."*





Social Plugin