Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार संघटनेचे तुमसर तालुका प्रमुख शेषराव गणवीर यांनी एकूण घेतले पेटी बांधकाम कामगारांच्या समस्या



आज दिनांक :- 17/10/ 2025 रोज शुक्रवार ला सचिन सेलिब्रेशन लॉन बेला, भंडारा येथे कामगार संच व गृहउपयोगी साहीत्य वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये ज्यांना तारीख मिळत असते त्यांना वितरण होत असते. परंतु आज रोजी गृहउपयोगी किट साहित्य उपलब्ध झालेले नाही, म्हणून बांधकाम विभागाने आपले ऑनलाईन सिस्टीम कॉम्प्युटर बंद केलं. त्यामुळे साहीत्य नेण्याकरीता आलेल्या बांधकाम कामगार यांच्या मध्ये गोंधळ उडाला. त्यांच्यावर तोडगा काढाण्याकरीता तुमसर तालुका प्रमुख शेषराव गणवीर यांनी पुढाकार घेऊन सर्व बांधकाम कामगारांच्या समस्या यावेळी ऐकून घेतल्या व त्यांच्यावर योग्य ते निर्णय घेऊन बांधकाम कामगार चे वरिष्ठ पदाधिकारी यांना फोन लावून त्यांचेसोबत या विषय वर बोलले. कर्मचारी यांनी त्यांना सांगितलं की आज जी तारीख आहे ती कॅन्सल करून पुन्हा दुसरी तारीख घेता येईल. 

परंतु कामगार विभाग यांच्या अपायमेंट लेटर वर सूचना लिहले आहेत की तुम्ही वेळेवर उपस्थित नाही राहिले तर तुमचा अर्ज नामजूर करण्यात येईल.मग कामगार यांची आज तारीख असताना त्यांना आजच ऑनलाईन करणे गरजेचे असते. त्यासाठी सर्व कामगार भडकले व नागपूर राष्ट्रीय महामार्ग जाम करत त्यांच्यावर योग्य ते निर्णय घ्यावा असे बोलुन चक्का जाम करण्यात आले त्यामुळे पोलीस प्रसासनाच्या मदतीने पुन्हा 5 वाजता सुरळीत पणे पेटी वाटप चालू करण्यात आले. गणवीर यांनी बांधकाम कामगारांच्या समस्या एकूण घेत.28/10/2025 ला मा.बचू भाऊ कडू साहेब यांना नागपूर येथे यांना निवेदन देऊन त्यावर समस्यचा योग्य ते निर्णय लावू व पेटी वाटप जिल्हा स्तरीय असल्याने कामगार बांधवांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे सदर पेटी वाटपाचा कार्यक्रम हा प्रत्येक तालुका स्तरावर करावे अशी मागणी शासनाकडे करु असे गणवीर यांनी कामगार बांधवांना यावेळी सागीतलें. त्यामुळे संपुर्ण कामगारामंध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. व सर्व कामगारांनी श्री गणवीर यांच आभार व्यक्त केले..