बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ललगुण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन दत्तात्रय घाडगे व व्हाईस चेअरमन अविनाश सदाशिव भोसले यांची बिनविरोध निवड झाली . राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या ताब्यात असणारी सोसायटीची सत्ता आमदार महेश शिंदे गटाच्या ताब्यात आली आहे . ललगुण विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सन २०२१=२२ मध्ये दुरंगी लढत झाली असून यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे ७ संचालक व आमदार महेश शिंदे गटाचे ६ संचालक विजयी झाले होते . त्यावेळी चेअरमन नागनाथ घाडगे व व्हाईस चेअरमन शामराव बंडगर यांची निवड करण्यात आली होती . चेअरमन व व्हाईस चेअरमन संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्यामुळे संचालकांनी सहायक निबंधक यांचेकडे अविश्वास ठराव संदर्भात अर्ज करून ठराव मंजुर करून घेतला होता .
त्याप्रमाणे अध्यासी अधिकारी दाजी खताळ यांच्या अध्यक्षतेखाली वडूज येथे दुपारी १ .३० वाजता संचालकांची विशेष सभा बोलविण्यात आली . यावेळी नितीन दत्तात्रय घाडगे , प्रदीप तुकाराम केंजळे , सुनिल रामचंद्र घाडगे , उल्हास गोरख केंजळे , सागर दशरथ काटकर , अविनाश सदाशिव भोसले , सुरज हरिशचंद्र शिंदे , कल्पना संपत घाडगे , सावित्रा दौलत घाडगे व संग्राम उर्फ सागर शिवाजी अडसुळ हे दहा संचालक विशेष सभेसाठी उपस्थित होते . तर संचालक नागनाथ घाडगे , शामराव बंडगर व अमोल घाडगे हे गैरहजर होते . यावेळी चेअरमनपदासाठी नितीन घाडगे व व्हाईस चेअरमन अविनाश भोसले यांनी अर्ज भरले . यावेळी दोनच अर्ज आल्यामुळे अध्यसी अधिकारी दाजी खताळ यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले . या निवडीबद्दल त्यांचे आमदार महेश शिंदे , डॉ प्रियाताई शिंदे , सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीरशेठ जाधव , भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शेडगे , जिल्हा नियोजन समिति व बुधचे उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे , हणमंत शिंदे ,युवा नेते विनोद घाडगे , माजी सरपंच जयवंत गोसावी , धनाजी घाडगे , नवनाथ वलेकर ., जितेंद्र घाडगे , विजय घाडगे , दिपक शिरतोडे, गणेश भोसले , राजेंद्र भोसले , प्रविण घाडगे , संतोष घाडगे , अमित शिरतोडे , विश्वजीत घाडगे , राजेंद्र काटकर व संचालक , सभासद यांनी अभिनंदन केले .





Social Plugin