Ticker

6/recent/ticker-posts

एम. सी. डी न्यू इंग्लिश स्कूल,घाटबोरी येथील तीन विद्यार्थी गोवा येथील राष्ट्रीय एबेकस स्पर्धेत विजेते.



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

काल दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी गोवा येथे आयोजित राष्ट्रीय एबेकस स्पर्धेत एम.सी.डी न्यू इंग्लिश स्कूल घाटबोरी चे तीन विद्यार्थी वेगवेगळ्या गटात विजेते ठरले.सविस्तर वृत्त असे की,शैक्षणिक सत्र 2024 पासून जिनीयस एबेकस अकॅडमी चे श्री.राहुल देवर सर व दीपा देवर मॅडम यांच्या मार्गदर्शनात घाटबोरी येथील विद्यार्थ्यांसाठी एबेकस हा सह शैक्षणिक उपक्रम चालू केला होता. घाटबोरी येथील या शाळेत शिक्षकांनी सुंदर प्रशिक्षण घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रशिक्षणाचे धडे दिले, ऑगस्ट 2025 मध्ये अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एम.सी. डी इंग्लिश स्कूल च्या आठ विद्यार्थ्यांची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.

तर या काल झालेल्या गोवा येथील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एम.सी.डी न्यू इंग्लिश स्कूल, घाटबोरी या शाळेचे कु.खुशी गणेश वानखेडेवर्ग आठवा तिने तिच्या वयोगटात प्रथम पारितोषिक मिळवत तीला विजेत्या ट्रॉफी सह सायकल बक्षीस म्हणून मिळाली. इयत्ता चौथी मधील मयूर संदीप काटेकर त्याच्या वयोगटात प्रथम विजेता ठरला.इयत्ता पहिली मधील वेदांत गजानन सौभागे हा त्याच्या वयोगटात विजेता ठरला. या सर्व विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक सह गोवा येथील राष्ट्रीय स्पर्धेत गौरविण्यात आले.या का एम.सी.डी न्यू इंग्लिश स्कूल च्या सौ.दुर्गा सौभागे व सौ.नंदा वानखेडे या दोन शिक्षिकांनी एबेकस  मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यावर विशेष मेहनत घेतली.महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन च्या वतीने विद्यार्थ्यांचे , शिक्षकांचे व शाळेचे विशेष कौतुक करण्यात आले 

कारण की या स्पर्धा महानगरमधील अकॅडमी अतिशय उच्च फी आकारून याचे नियोजन करून घेत असतात मात्र अतिशय दुर्गम व ग्रामीण भागातील शाळेने शाळेच्या फी मधेच मुलांकडून अशा प्रकारचे उपक्रम राबवून घेणे,त्यांना जिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर घेऊन जाणे कठोर मेहनत घेऊन राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविने,देशातील अनेक राज्यांच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत उतरविणे व तिथे घाटबोरी सारख्या ग्रामीण शाळेचे विशेष ओळख तयार करणे हे सर्व शिक्षकाच्या व शाळेच्या परिश्रमातूनच होऊ शकते.