अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
ह.भ.प.महंत श्री १००८ ब्रह्मलीन कार्तिक स्वामी भारती बाबा यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त श्री.ब्रह्मलीन तुका बाबा यांच्या कृपाशीर्वादाने, ह.भ.प कृष्णदेव महाराज काळे, ह.भ.प. खडेश्वरी महाराज तुपेवाडी,वनारशी संस्थानचे मठाधिपती महंत श्री 1008 स्वामी संबित चैतन्य बाबाजी यांच्या प्रेरणेने व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने ह.भ.प.श्रीरंग महाराज डोंगरे (यजमान मनोज भानुदास पाटोळे)यांच्या अमृततुल्य वाणीतून शिव कथा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह व सप्त दिन लघु रुद्राभिषेक कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. पहाटे ४ ते ६ काकडा भजन,६ ते ७ विष्णुसहस्रनाम,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण व रुद्राभिषेक,१० ते १२ शिव पुराण कथा,दुपारी २:३० ते ४:३० दैनिक महाप्रसाद,सं.६ ते ७ हरिपाठ,८:३० ते १०:३० हरीकिर्तन व नंतर जागर होणार आहे.
१)तसेच दि २४/१०/२०२५ रोजी ह.भ.प.श्री आयुर्वेदाचार्य अवधेशानंद स्वामी
२)दि २५/१०/२०२५ रोजी ह.भ.प.श्री भानुदास महाराज शास्त्री
३)दि २६/१०/२०२५ रोजी श्री ह.भ.प.महंत प्रकाशानंद महाराज गिरी
४)दि २७/१०/२०२५ रोजी श्री.ह.भ.प.सुदाम देव महाराज
५)दि २८/१०/२०२५ रोजी श्री ह.भ.प श्री.देविदास महाराज मस्के
६)दि २९/१०/२०२५ रोजी श्री ह.भ.प.श्री तुकाराम महाराज कडपे
७)दि ३०/१०/२०२५ रोजी सकाळी गोपाष्टमी निमित्ताने १०ते १२ या वेळेत श्री ह.भ.प.नरसिंग महाराज मुकुटकर व ९ ते ११ वेळेत श्री ह.भ.प.अनिल महाराज पाटील
८)दि ३१/१०/२०२५ रोजी ब्रह्मलीन कार्तिक स्वामी भारती बाबा यांच्या समाधीउत्सव निमित्त ६ ते ८ वेळेत श्री.ह.भ.प भागवताचार्य दिनकर महाराज चिमणे व १० ते १२ या वेळेत श्री.ह.भ.प चांगदेव महाराज काकडे यांच्या अमृततुल्य वाणीतून काल्याचे किर्तन होणार असून या किर्तनाचा व शिव पुराण कथेचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे संस्थांनचे सर्व विश्वस्त व मठाधिपती महंत श्री.१००८ स्वामी संबित चैतन्य भारती बाबा व सप्ताह कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.





Social Plugin