बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्र कारागृह विभागाचे डॉ. श्री सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, श्री योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, श्री सुनील ढमाळ, कारागृह उपमहानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा कारागृहातील बंदयांसाठी दिवाळी सणानिमीत् "सप्तसूर फाऊंडेशन, सातारा यांचेमाध्यमातून दिवाळी पहाट" हा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर "संगीतमय दिवाळी पहाट" या कार्यक्रमामध्ये नवीन, जुन्या मराठी व हिंदी गाणी गायकांनी सादर केली. बंदयांनी सदर कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी तसेच कारागृहातील बंदयांनी देखील गाणी सादर केली.
सदर दिवाळी पहाट कार्यक्रमास सप्तसूर फाऊंडेशनचे सदस्य व गायक धीरेंद्र राजपुरोहित, प्रकाश सावंत, सुनील भोजने, विजय साबळे, अनुराधा पंडितराव, ममता नरहरी, वनिता कुंभार, दिपाली घाडगे, महिला व बालकल्याणच्या श्रीमती स्वरूपा पोरे, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरूंग अधिकारी टी एस निंबाळकर, अति. वरिष्ठ तुरूंग अधिकारी सतिश कदम, तुरूंग अधिकारी श्रीमती तडाके, श्रीमती कुंटे, सुभेदार मानसींग बागल, हवालदार मारूती नवघणे, दत्तात्रय चव्हाण, अहमद संदे, शिपाई सागर मासाळ, तानाजी बुडगे, अभिजीत गोसावी, चांद पटेल, रवि पवार, राकेश पवार, ज्योती शिंगरे, प्रशांत कदम व कारागृहातील सर्व बंदी हजर होते.





Social Plugin