देगलूर- प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असता देगलुरात शिवसेना शिंदे गटाकडून कंबर कसली जात असुन शिवसेनेचे वरीष्ठ नेत्यांनी स्वबळाचा नारा देऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याने वरिष्ठांनाचे आदेशाचे पालन करण पक्षांचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बोंढारकर ,बालाजी पाटील खतगावकर साहेब,उपनेते आनंदराव पाटील, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, यांच्या आदेशानुसार आज देगलुरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले धनाजी जोशी यांचा भावी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयश्रीताई बाळु काब्दे यांच्या हस्ते भगवी दस्ती घालून प्रवेश करण्यात आला व तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील तुळजाभवानी मंदिर,साळवण हनुमान मंदिर,दत्त मंदिर,महादेव मंदिर, विरभद्र शिव मंदिर साठे नगर,आदी भागात जाऊन नारळ फोडुन आशिर्वाद घेऊन शुभकार्यासाठी सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित भावी जयश्रीताई बाळु काब्दे, बाळु काब्दे, शिवसेना तालुकाप्रमुख गंगाधर तमलुरकर,शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरमवार, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सविता ताई चप्पलवार, अशोक पांडलवार,मिलिंद सोनकांबळे कावळगावकर,किरण काब्दे ,नागेश आंगडे कावळगावकर,श्याम मारोती मंडपवार,ओमकार पाटील, यांच्या समवेत प्रभागातील प्रमुख लोक उपस्थित होते....
मागील दोन ते तीन दशकांपासून नगरसेवक रुपाने जनतेच्या सेवेमध्ये मी व माझा परिवार सदैव तत्पर आहे. जेव्हा ह्या वेळेसच्या मतदानामध्ये नगराध्यक्ष पदासाठी महिलेला आरक्षण आहे हे कळले तेव्हा माझ्या पत्नीने माझ्याजवळ नगराध्यक्ष रुपाने देगलूर ला सेवा द्यावी ही इच्छा व्यक्त केली. आजवरच्या सेवेच्या कार्यामध्ये माझ्या पत्नीने अखंड मला साथ दिली आणि आज वेळ आली आहे की तिला मला साथ देण्याची. आणि मी ती नक्की देणारच.
शिंदे गटाकडून बरेच उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत पण आमचे मागील दोन ते तीन दशकाची सेवा पाहून पक्षश्रेष्ठींनी आम्हाला आत्मविश्वासाने तिकीट मिळेल असा शब्द दिला आहे.-बाळु काब्दे (भावी नगराध्यक्ष जयश्रीताई बाळु काब्दे यांचे पती )





Social Plugin