*सिमेंट रस्त्याच्या कामाचे आ. उढाण यांच्या हस्ते उद्घाटन*
*स्थानिक निधीतून विकासकामांना गती शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
करंजळा (ता.अंबड) येथे स्थानिक आमदार निधीतून मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे लोकार्पण आज (दि.२३ ऑक्टोबर २०२५) आमदार हिम्मत दादा उढाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या नवीन रस्त्यामुळे करंजळा ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळाला असून,यामुळे गावातील विकासकामांना आणखी गती मिळेल,असे मत आमदार उढाण यांनी यावेळी व्यक्त केले.
आमदार हिम्मत दादा उढाण यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे करंजळा येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून,आज सायंकाळी ४:३० वाजता लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी आमदार उढाण यांच्या हस्ते फित कापून व नारळ फोडून रस्त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.
या महत्त्वपूर्ण समारंभास बापुराव देशमुख प्रशांत उढाण,अविनाश मांगदरे,अशोक बोटे,राजेंद्र मोताळे तसेच करंजळा गावातील स्थानिक पदाधिकारी,शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी एकजुटीने काम करून गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.





Social Plugin